५ असे कोर्स जे २०२१ मध्ये B.Com विद्यार्थ्यांचे जीवन बदलू शकतात ( 5 courses that could change B.Com students' lives in 2021)
जशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत चालली आहे तसे वाणिज्य शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना करिअर च्या अनेक वाटा उपलब्ध होत चालल्या आहेत. आज या लेखात आपण B.Com नंतर करता येतील अशा काही चांगल्या कोर्सेस बद्दल चर्चा करणार आहोत. १) CA ( Chartered Accountant ) आपणास माहित आहेच कि सी. ए. हि वाणिज्य शाखेतील सर्वोच्च पदवी समजली जाते. या कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना Accountancy, Taxation, Auditing बद्दल सखोल माहिती दिली जाते. भारतामध्ये सी. ए. केलेल्या लोकांची ची संख्या गरजेपेक्षा कमी असल्यामुळे हा एक उत्तम करिअर चा मार्ग असू शकतो. २) CWA ( Cost and Works Accountant ) C.A. प्रमाणेच याही कोर्स मध्ये विद्यार्थांना Cost Accounting, Taxation इत्यादी बद्दल सखोल माहिती दिली जाते. C.A. प्रमाणेच भारतामध्ये CWA केलेल्या लोकांची ची ही संख्या गरजेपेक्षा कमी असल्यामुळे हाही एक उत्तम करिअर चा मार्ग होऊ शकतो. ३) CS ( Company Secretary ) कंपनी सेक्रेटरी हा एक कंपनी व त्याचे शेअर होल्डर यामधील एक महत्वाचा दुवा असतो. तसेच कंपनी कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी या दृष्ठीने एक कंपनी स...