मित्रांनो आपण लहानपणीपासूनच ऐकत आलोय कि यशस्वी होण्यासाठी हार्ड वर्क खूप गरजेचे आहे. परंतु आजकालच्या स्पर्धेच्या युगात फक्त हार्ड वर्क असून चालत नाही तर हार्ड वर्क ला स्मार्ट वर्क ची जोड असणेही तेवढेच गरजेचे झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्याच्या परीक्षांचे स्वरूप खूपच बदलले आहे. तसेच अभ्यासक्रम हि खूप जास्त वाढला आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेत सर्व अभ्यास करुन चांगले गुण मिळवणे खूपच अवघड होत चालले आहे. म्हणूनच आज या लेखात मी आपणास एक असा फोर्मुला सांगणार आहे ज्याने आपण कमी वेळात व कमी कष्टात जास्तीत जास्त गुण मिळवू शकता. चला तर मग सुरु करूया : मित्रांनो आपल्याकडे जेवढे कपडे आहेत त्यापैकी २०% कपडेच आपण ८०% वेळा घालत असतो. तसेच आपल्या Whatsapp मध्ये जेवढे मित्र आहेत त्यापैकी जवळपास २०% लोकांशीच आपण ८०% वेळा चॅटिंग करत असतो. तुम्ही या गोष्टीचा या आधी कधी असा विचार केला होता का ? नाही ना ? रिचर्ड कोच यांचे दि. एटी ट्वेंटी प्रिन्सिपल हे पुस्तक वाचण्याआधी मी हि या गोष्ठींचा कधी असा विचार केला नव्हता. रिचर्ड कोच यांच्या मते तुमच्या २० टक्के कामातूनच ८० टक्के Result मिळतात. हेच तत्व अ...