मित्रांनो आपण लहानपणीपासूनच ऐकत आलोय कि यशस्वी होण्यासाठी हार्ड
वर्क खूप गरजेचे आहे. परंतु आजकालच्या स्पर्धेच्या युगात फक्त हार्ड वर्क असून
चालत नाही तर हार्ड वर्क ला स्मार्ट वर्क ची जोड असणेही तेवढेच गरजेचे झाले आहे.
पूर्वीच्या तुलनेत सध्याच्या परीक्षांचे स्वरूप खूपच बदलले आहे. तसेच अभ्यासक्रम
हि खूप जास्त वाढला आहे. त्यामुळे उपलब्ध वेळेत सर्व अभ्यास करुन चांगले गुण
मिळवणे खूपच अवघड होत चालले आहे. म्हणूनच आज या लेखात मी आपणास एक असा फोर्मुला
सांगणार आहे ज्याने आपण कमी वेळात व कमी कष्टात जास्तीत जास्त गुण मिळवू शकता. चला
तर मग सुरु करूया :
मित्रांनो आपल्याकडे जेवढे कपडे आहेत त्यापैकी २०% कपडेच आपण ८०% वेळा
घालत असतो. तसेच आपल्या Whatsapp मध्ये जेवढे मित्र आहेत त्यापैकी जवळपास २०%
लोकांशीच आपण ८०% वेळा चॅटिंग करत असतो. तुम्ही या गोष्टीचा या आधी कधी असा विचार केला
होता का ? नाही ना ? रिचर्ड कोच यांचे दि. एटी ट्वेंटी प्रिन्सिपल हे पुस्तक
वाचण्याआधी मी हि या गोष्ठींचा कधी असा विचार केला नव्हता.
रिचर्ड कोच यांच्या मते तुमच्या २० टक्के कामातूनच ८० टक्के Result मिळतात.
हेच तत्व अभ्यासामध्ये हि लागू आहे असा आपणास नाही का वाटत. जरा खोलात जाऊन विचार
केलात तर तुमच्या लक्षात येईल कि तुमच्या पुस्तकात जेवढे प्रश्न आहेत त्यापैकी जवळपास
फक्त २०% प्रश्नच तुम्हाला परीक्षेत ८० टक्के मार्क मिळवून देतात. म्हणूनच आज आपण
पाहणार आहोत कि पेरेटो प्रिन्सिपल अभ्यासात वापरून कमी वेळात व कमी मेहनतीत
जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील.
स्टेप १ :
कोणत्याही परीक्षेचा जो अभ्यासक्रम असतो त्यातील २०% भाग असा असतो कि
जो खूप महत्वाचा असतो व तो परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त असते.
त्यामुळे सर्वप्रथम आपणास संपूर्ण अभ्यासक्रमामधील तो २०% महत्वाचा भाग शोधून
काढावा लागेल. सर्वसाधारणपणे मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका चाळळ्यास आपणास तो २०%
महत्वाचा भाग शोधून काढणे सहज शक्य होईल. तसेच आपण संबंधित विषय शिक्षकांशी चर्चा
केल्यास तेही आपणास या कामात मदत करू शकतील.
स्टेप २ :
आता आपणास संपूर्ण अभ्यासक्रमाचे दोन भागात विभाजन करावयाचे आहे
१. अति महत्वाचा ( २०% )
२. कमी महत्वाचा ( ८०% )
स्टेप ३ :
अभ्यासक्रमाचे दोन भागात विभाजन केल्यानंतर आपणास आता खऱ्या अभ्यासाला
सुरवात करायची आहे. चला तर पाहूया अभ्यास कसा करायचा आहे :
१) आता सर्वप्रथम आपणास अति महत्वाच्या २०%
अभ्यासक्रमापासून सुरुवात करायची आहे. अति महत्वाच्या अभ्यासक्रमाची कसून तयारी
करायची आहे. त्यापैकी कोणताही भाग न सोडता सर्व च्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी मुखोद्गत
करायची आहेत. या २०% अभ्यासक्रमामधील जे प्रश्न परीक्षेत विचारले जातील त्या
प्रश्नांची उत्तरे इतकी चांगली लिहिता आली पाहिजेत कि त्यातील एक हि मार्क जाता
कामा नये. हा भाग अति महत्वाचा असल्यामुळे व आपणास जास्तीत जास्त मार्क्स मिळवून
देणार असल्यामुळे न घाई करता व बाकी अभ्यासक्रमाचा विचार न करता हा भाग अभ्यासायचा
आहे. शक्यतो या भागाच्या नोटस काढून ठेवणे योग्य ठरते. कारण परीक्षेच्या आदल्या
दिवशी हा भाग आपणास पुन्हा एकदा नजरेखालून घालणे सोपे होते.
२) अति महत्वाचा २० % भागाचा चांगला अभ्यास
झाल्यानंतरच कमी महत्वाच्या ८०% भागाकडे वळायचे आहे. आता तुमच्याकडे जेवढा वेळ
उरला आहे त्याचा हिशोबाने व जरा वेगाने या भागाचा अभ्यास करावयाचा आहे. या
भागाच्या नोटस नाही काढल्या तरी चालतील.
अशा प्रकारे जर ८० : २० या स्मार्ट प्रिन्सिपल चा आपण आपल्या अभ्यासात
वापर केलात तर नक्कीच आपणास कमी वेळात चांगले गुण मिळवता येतील.
सीए. संतोष नलवडे
PHONE : +91 98 60 46 86 56
EMAIL : casmnalawade@rediffmail.com

Comments
Post a Comment