आजकाल आपण सर्वांच्या तोंडी ऐकतो कि बेरोजगारी खूप वाढली आहे आणि चांगली नोकरी मिळवणे खूप
अवघड आहे. पण याठिकाणी एक गोष्ठ विसरली जाते कि कोणतीही नोकरी मिळवण्यासाठी
त्यासाठी काही आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असते. आणि अशी कौशल्ये
आपल्याकडे असतील तर माझ्या मते चांगली नोकरी मिळवणे फारसे अवघड नाही. वाणिज्य
शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही अशी काही कौशल्ये शिकून घेणे आवश्यक
आहे. खालील काही कौशल्ये आत्मसात करुन घेतल्यास सहजपणे चांगली नोकरी मिळवणे शक्य
आहे.
१) बेसिक अकौंटिंग :
सर्व वाणिज्य
शाखेच्या विद्यार्थांना बेसिक अकौंटिंग येणे खूप आवश्यक आहे. बेसिक अकौंटिंग मध्ये
आपण जर्नल एन्ट्री, लेजर पोस्टिंग, ताळेबंद तयार करणे, बँक रिकन्सीलेक्शन
स्टेटमेंट तयार करणे इत्यादी येणे आवश्यक आहे.
२) कॉम्पुटर चे
ज्ञान : आजकाल अकौट ची जवळजवळ सर्व कामे कॉम्पुटर वर होतात त्यामुळे आपण कॉम्पुटर
मधील खालील बाबीत तरबेज असणे आवश्यक आहे.
·
MS –
Word वापरणे
·
MS –
Excell वापरणे
·
e –
mail वापरणे
·
मरठी व
इंग्रजी टायपिंग
३) Tally Software :
Tally हे अकौंट
खेत्रातील सर्वात महत्वाचे software आहे. कोणत्याही अकौंट संबंधी मुलाखतीला आपण
गेल्यास पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे tally येते का. त्यामुळे tally
software उत्तम वापरता येणे आवश्यक आहे.
४) बँक व्यवहारा
संबंधी बेसिक माहिती :
सर्व
विध्यार्थ्यांना बँक व्यवहाराची बेसिक माहिती असलीच पहिले. बँक व्यवहारामध्ये
बँकेत पैसे जमा करणे, बँकेतून पैसे काढणे, चेक लिहिणे, DD काढणे इत्यादी कामे
शिकून घेणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे काही
महत्वाची कौशल्ये कॉलेज सुरु असतानाच शिकून घेतली तर त्याचा आपल्या भावी आयुष्यात
नक्कीच फायदा होईल व कॉलेज संपल्यानंतर हे सर्व शिकण्यासाठी जो वेळ जाणार आहे तो
वाचेल.
CA. Santosh Nalawade
Comments
Post a Comment