आजकाल स्पर्धा खूपच वाढली आहे त्यामुळे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नोकरी
देण्यापूर्वी उमेदवाराला व्यवस्थित पडताळून पहिले जाते. त्यांची शैक्षणिक योग्यता व
पगाराची अपेक्षा जाणून घेण्यासाठी मुख्यतः मुलाखत घेतली जाते. बऱ्याचदा फक्त
इंटरव्ह्यू चांगला न जाण्यामुळे चांगली नोकरी हातातून जाण्याची शक्यताही नाकारता
येत नाही. म्हणूनच आज या लेखात आपण नोकरी साठी मुलाखत कशी द्यावी याबाबत चर्चा
करणार आहोत. मुलाखत देत असताना खालील गोष्टींची काळजी घेतलीत तर आपली मुलाखत नक्की
यशस्वी होईल :
१) कंपनी बद्दल
जाणून घ्या :
तुम्ही ज्या कंपनी मध्ये इंटरव्ह्यू साठी जाणार आहात त्या कंपनी बद्दल
पुरेशी माहिती आपणास असणे आवश्यक आहे. कंपनीच्या वेबसाईट वर आपणास हि माहिती मिळू
शकते. कंपनी कधी सुरु झाली, कंपनी चा व्यवसाय काय,
मालक कोण इत्यादी माहिती मुलाखतीला जाण्यापूर्वी जाणून घ्यावी.
२) योग्य कपडे
घालावी :
इंटरव्ह्यू साठी जाताना आपले कपडे योग्य असणे खूप गरजेचे आहे. मुलाखती
साठी जाताना स्वच्छ व इस्त्री केलेले कपडे घालावे. शक्यतो टी – शर्ट, जीन्स इ. कपडे
टाळावे. आपले कपडे आपण ज्या पोस्ट साठी मुलाखत देत आहोत त्या पोस्ट ला साजेशे
असावेत याची काळजी घ्यावी. एखादा हलका परफ्युम वापरायला हरकत नाही.
३) वेळेच्या किमान
१० मिनिटे तरी आधी पोहोचावे :
मुलाखतीची जी वेळ ठरली आहे त्या वेळेच्या किमान दहा मिनिटे आधी आपण मुलाखतीच्या
ठिकाणी असणे आवश्यक आहे. वेळेच्या आधी पोहोचल्या मुळे ऐनवेळी होणारी धावपळ टळेल व
आपली चुकीची इमेज तयार होणार नाही.
४) जनरल
प्रश्नांची आधीच तयारी करुन ठेवावी :
प्रत्येक मुलाखतीमध्ये काही ठरलेले प्रश्न असतात त्यांची आधीच तयारी
केलेली असेल तर मुलाखती मध्ये आपण आत्मविश्वासाने त्यांची उत्तरे देऊ शकतो. खालील
काही प्रश्न प्रत्येक मुलाखतीत विचारले जातात :
·
तुमच्या बद्दल काही सांगा
·
आपण आमच्याच कंपनी मध्ये का काम
करू इच्छिता
·
आपली पगाराची अपेक्षा काय आहे
·
आधीची नोकरी का सोडली
५) मुलखातिला
जाताना आपला RESUME सोबत घ्यायला विसरू नका.
६) शक्यतो आपली
व्यक्तिगत माहिती देणे टाळा :
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने विचारल्या शिवाय आपली व्यक्तिगत माहिती उदाहरणार्थ
आपली आर्थिक परिस्थिती इत्यादी देणे टाळावे.
७) उत्तरे
शक्यतो मुद्देसूद असावी :
मुलाखत घेणार्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शक्यतो मुद्देसूद द्यावीत.
जास्त पाल्हाळ लाऊ नये. अनावश्यक माहिती देणे शक्यतो टाळावे.
८) मुलाखत चालू
असताना खोकला किंवा शिंक आल्यास तोंडासमोर हातरुमाल धरायला विसरू नका.
९) केबिन मध्ये
प्रवेश करताना घाई करू नये :
मुलाखतीच्या केबिन मध्ये जाताना घाई करू नये. सावकाश केबिन मध्ये प्रवेश
करावा. तसेच मुलाखत घेणार्यांना स्मित हास्य करुन अभिवादन करावे. तसेच सूचना
मिळेपर्यंत खुर्चीवर बसू नये.
१०) मुलाखत
संपवताना :
शक्यतो सूचना मिळेपर्यंत आपली जागा सोडू नका, जाताना अभिवादन करायला विसरू
नका तसेच एकदा निघाल्यावर मागे वळून पाहू नका.
CA. SANTOSH NALAWADE
Email : casmnalawade@rediffmail.com
Phone : +91 98 60 46 86 56

Comments
Post a Comment