सार्वजनिक विश्वस्थ संस्थां या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालत
असलाल्या तरी Bombay Public Trust Act,
1950 नुसार काही कायदेशीर गोष्टींची पूर्तता करणे कायद्याने
बंधनकारक आहे. कायद्यात नमूद केलेल्या काही महत्वाच्या तरतुदी खालील प्रमाणे आहेत
:
१) हिशोब लिहिणे ( कलम ३२, नियम १७ )
सर्व सार्वजनिक विश्वस्थ संस्थांना आर्थिक वर्षात केलेल्या सर्व जमा
खर्चाचा विहित नमुन्यात हिशोब लिहिणे आवश्यक आहे.
२) स्थावर आणि जंगम मालमत्तेची नोंदवही ठेवणे ( कलम ३६ब, नियम २४अ )
सर्व सार्वजनिक विश्वस्थ संस्थांना त्यांच्या जवळ असणाऱ्या सर्व
स्थावर व जंगम मालमत्तेची नोंद विहित नमुन्यात ठरवून दिलेल्या नोंदवहीत ठेवणे
आवश्यक आहे.
३) चेंज रिपोर्ट सदर करणे ( कलम २२, नियम १३ )
जर स्थावर अथवा जंगम मालमत्तेत बदल झाला अगर विश्वस्थ कमी अथवा जादा
झाल्यास ९० दिवसाच्या आत घर्मादय कार्यालयात चेंज रिपोर्ट सदर करणे आवश्यक आहे.
४) अंदाजपत्रक सदर करणे ( कलम ३१अ, नियम १६अ )
प्रत्येक संस्थेने आपले आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी किमान १ महिना
आधी (किमान २८ फेब्रुवारी आधी) पुढील वर्षाचे अंदाजपत्रक तयार करुन धर्मादाय
कार्यालयात सदर करणे आवश्यक आहे.
५) जमाखर्चाच्या हिशोबाचे ऑडीट करुन घेणे ( कलम ३४, नियम १९ आणि २१ )
प्रत्येक संस्थेने आपले आर्थिक वर्ष संपल्यावर ६ महिन्याच्या म्हणजेच
३० सप्टेंबर च्या आत ऑडीट करुन घेणे आवश्यक आहे.
CA. SANTOSH NALAWADE
Contact : 9860468656
Email : casmnalawade@gmail.com
CA. SANTOSH NALAWADE
Contact : 9860468656
Email : casmnalawade@gmail.com

Nice article
ReplyDelete